मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

पूर्ण चंद्रग्रहणाचे विभिन्न राशींवर प्रभाव!

WD
11 वर्षानंतर सर्वात जास्त काळाचे पूर्ण चंद्रग्रहण 15 व 16 जूनच्या रात्री घडणार आहे. जे संपूर्ण भारतात दृश्यमान राहिल. हे वृश्चिक राशी व ज्येष्ठ नक्षत्रात घडणार आहे. हे ग्रहण मूळ नक्षत्र धनू राशीवर समाप्त होणार आहे, त्यामुळे धनू राशीवर देखील ग्रहणाचा प्रभाव राहील. तस बघितलं तर ग्रहण प्रत्येक वर्गाच्या लोकांसाठी कष्टप्रद राहणार आहे. सामान्य नागरिक परेशान राहणार आहे, वाढती महागाईवर लगाम लावण्यास सरकार अपयशी ठरेल. देशात अन्न धान्याचा कोटा भरपूर आहे पण गरीबांच्या नशिबात पोटभर जेवण देखील नाही आहे.

हे ग्रहण कुंभ लग्न, वृश्चिक राशी, ज्येष्ठ नक्षत्रापासून सुरू होऊन वृषभ लग्न, धनू राशी व मूळ नक्षत्रावर समाप्त होणार आहे. 15 जून रोजी लागणाऱ्या चंद्रग्रहणाचे सुतक दुपारी 2.53 पासून सुरू होणार आहे. ग्रहण रात्री 11.53 मिनिटापासून सुरू होऊन 3.22 मिनिटावर संपणार आहे.

विभिन्न राशींवर ग्रहणाचा प्रभाव :-

मेष राशीच्या लोकांसाठी हे फारच कष्टदायक राहणार आहे, म्हणून त्यांनी हे ग्रहण न पाहण्याचा सल्ला आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील हे कष्टप्रद आहे.
मिथुन राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण सुखकारक राहणार आहे.
कर्क राशीच्या लोकांसमोर चिंताजनक परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी हे कष्टकारक राहणार आहे.
कन्या राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण आर्थिक दृष्ट्याने लाभदायक ठरेल.
तुळा राशीच्या लोकांना नुकसान होण्याची शक्यता संभवते.
वृश्चिक राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगायला पाहिजे.
धनू राशीच्या जातकांना हानी होण्याची शक्यता आहे.
मकर राशीच्या लोकांना धन लाभ होईल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण फारच शुभ राहणार आहे.
मीन राशीच्या जातकांना सावधान राहण्याची गरज आहे, अपमान सहन करावा लागेल.