मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

काजळ पसरू नये म्हणून हे करा

अनेक लोकं केवळ या कारणामुळे काजळ लावणे टाळतात की थोड्या वेळाने ते पसरू लागत आणि चेहरा काळपट दिसू लागतो. ऑयली स्किन असणार्‍यांसाठी ही समस्या अगदी सामान्य आहे. म्हणून दिवसभर काजळ सुरक्षित ठेवायचं असेल तर हे टिप्स अमलात आणा:
चेहरा स्वच्छ ठेवा
चेहरा तेलकट नसावा यासाठी चेहरा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. काजळ लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ असावा.
 
आयशेडो वापरा
काळं किंवा ग्रे रंगाचे आयशेडो वापरल्या काजळ उठून दिसतं आणि याने त्वचेवर ऑयलचे प्रमाणही कमी होतं. याने काजळ सौम्य होऊन दिवसभर टिकून राहतं.

पावडर लावा
काजळ लावल्यावर आपल्या डोळ्याखाली थोडी पावडर लावा. याने स्किन ऑयली होण्यापासून वाचेल आणि काजळ पसरणार नाही.
 
ब्लॉटिंग पेपर
आपल्या पापण्या अधिक ऑयली असल्यास स्वत:कडे ब्लॉटिंग पेपर असू द्या. जेव्हाही ऑयली फिल व्हाल लागेल ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने ते टिपून घ्या.

योग्य काजळ
नेहमी उच्च ब्रँडेड काजळ वापरा. बाजारात अनेक आणि स्वस्त पर्याय उपलब्ध असले तरी आपल्याला सर्वोत्तम काजळ निवडायचे आहे हे लक्षात असू द्या. इतर काजळ लवकर पसरतात आणि डोळ्यांच्या जवळपास डाग सोडतात.
 
जेल
काही केल्या काजळ टिकत नसेल तर जेल लाइनर वापरा. हे घट्ट असतं आणि पसरत नाही. पेंसिल काजळच्या तुलनेत हे महाग असले तरी दिवसभर टिकून राहतात.