शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (08:15 IST)

केसांसाठी रामबाण आहे शिकाकाई नक्की वापरा

प्रत्येक स्त्री ची इच्छा असते लांब काळे भोर आणि निरोगी केस असणे.ती केसांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी सर्व उपाय करते.तरी ही केस गळतात, तुटतात,केसात कोंडा होणे,केस अकाळी पांढरे होणे .या सारख्या समस्यां उद्भवतात. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि केसांना घनदाट आणि काळेभोर करण्यासाठी शिकाकाई वापरा.हे प्राचीन हेयर क्लिन्झर आहे केसांच्या समस्यांशी लढण्यासाठी उपयुक्त आहे. या मध्ये व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक घटक आहे जे केसांना निरोगी आणि सुंदर बनवतात. चला तर मग शिकाकाईचा वापर कसा करावा जाणून घेऊ या.   
 
साहित्य- 2 मोठे चमचे शिकाकाई,2 मोठे चमचे आवळा पूड,1 मोठा चमचा रीठा पूड,पाणी गरजेप्रमाणे.
कृती -हे बनविण्यासाठी शिकाकाई मध्ये आवळा आणि रीठापूड मिसळा.ही पूड गरम पाण्यात घालून पेस्ट बनवा ही पेस्ट केसांना लावा.1 -2 तास तसेच ठेवा नंतर पाण्याने धुवून घ्या.या मुळे आपले केस चमकदार आणि सुंदर होतील.
 
* शिकाकाई वापरण्याचे फायदे-
* शिकाकाई केसांच्या वाढी साठी चांगले आहे.या मध्ये अँटीऑक्सीडेंट भरपूर आहे जे फ्री रेडिकल्सशी लढण्यात मदत करते.
* दोन तोंडी केस शिकाकाई वापरल्याने नाहीसे होतात.
* हे केसांना तुटण्यापासून रोखतात आणि केसांना मजबूत करतात. 
* केसांची चमक वाढवते.
* केसातील कोंड्याला दूर करते.
* स्कॅल्पसाठी चांगले आहे. या मध्ये अँटी फंगल आणि अँटी बेक्टेरियल गुणधर्म आहे .जे स्कॅल्प शी संबंधित समस्यांना दूर करून स्कॅल्प मध्ये रक्त प्रवाह चांगला करते.
* केसांना पांढरे होण्यापासून रोखते.