1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

कावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या

लोकांच्या कावळ्याप्रती विविध समजूत आहेत त्यातून आपण लहानपणापासून ऐकले असेल की दारात कावळा ओरडला की पाहुणे येतात. किंवा काही लोकांप्रमाणे तर कावळा घराच्या आसपास असल्यास शोकसमाचार असल्याचीही समजूत आहे.
 
अनेक लोकं यावर विश्वास करतात तर अनेक याला अंधविश्वास असल्याचं म्हणतात. परंतू अनेकदा कावळा संकेत देत असतो की पुढे शुभ वा अशुभ घडणार आहे ते...
* कावळ्याच्या अंडींची संख्या शुभाशुभाची भविष्यवाणी ठरवते.
* कावळ्याच्या एका अंडीला कारूण असे म्हटले जातं. हे चांगला पाऊस आणि चांगल्या पिकाचे संकेत आहे. याने लोक आनंदी राहतात.
* जर अंडी दोन आहे, तर याला अग्नी समजले जातं. अश्या स्थितीत अल्प वर्षा होते. शेतात पेरलेल्या बिया अंकुरित होत नसून लोकं दुखी राहतात.
* तीन अंडीला वायू म्हटले आहे. हेही शुभ संकेत नाही. प्राणी पिके नष्ट करतात.
* कावळ्याने चार अंडी दिल्यास याला इंद्र म्हटलं जातं. हे अतिशय शुभ मानले आहे. 

* यात्रेची प्लानिंग करताना, किंवा यात्रा सुरू करण्यापूर्वी कावळ्याला दही-भाताचा नैवेद्य दाखविल्याने यात्रा यशस्वी पार पडते.
* कावळ्याने डाव्या बाजूने येऊन नैवेद्य ग्रहण केल्यास यात्रा निर्विघ्न संपन्न होते.
* कावळा मागून आल्यास प्रवाश्याला फायदा होतो.
* उजवीकडून उडत डाव्या बाजूला येऊन नैवेद्य ग्रहण केल्यास यात्रा यशस्वी पार पडते. अन्यथा विपरित फल प्राप्त होतं.
* कावळ्याने समोरहून येऊन नैवेद्य ग्रहण केल्याने पायाने डोकं खाजवल्यास कार्य सिद्ध होतं.
* नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा विहिरीच्या पाळीवर, नदी काठावर किंवा कोणत्याही जलयुक्त घाटावर जाऊन बसल्यास हरवलेली वस्तू परत मिळते. खटला सुटतो आणि धन-धान्य लाभतं.
* नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा बंगला किंवा घराच्या पोटमाळावर किंवा हिरव्या झाडावर जाऊन बसल्यास अकस्मात धन लाभ प्राप्तीचे योग असतात.

* आपल्या तोंडात पोळी, फळ किंवा मासाचा तुकडा दाबलेल्या कावळ्या बघितल्यास कामात यश लाभतं.
* कावळा गायीच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते.
* कावळा आपल्या चोचेत कोरडी गवत घेऊन जाताना दिसल्या धन लाभ होतं.
* कावळ्याच्या चोचेत फूल-पाने दिसल्यास इच्छा पूर्ण होते.
* कावळा धान्याजवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होतं आणि गायीच्या डोक्यावर बसलेला दिसल्यास प्रियजनांची भेट होते.
* उंटाच्या पाठीवर कावळा दिसल्यास यात्रा कुशल होते.
* डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसल्यास प्रचंड संपत्ती मिळते.
*  जर कावळा धुळीत लोटताना दिसला तर त्या जागी पाऊस पडण्याची शक्यता असते.