बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

जेट एअरवेजची विस्तार योजना

खाजगी क्षेत्रातील विमान कंपनी जेट एअरवेजने ब्रिटनच्या वर्जिन अटलांटीक व ब्रिटीश एअरवेजच्या स्पर्धेत उतरण्यासाठी 1.9 अब्ज पाउंड रूपयांच्या विस्तार योजनेची घोषणा केली आहे.

यात बोइंग कडून 30 नवीन विमान खरेदीचाही समावेश आहे. यादृष्टीने येत्या एक मे पासून कंपनीने 'बेडरूम इन स्काई' योजना सुरू करणार असल्याचे समजते.

जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी नवीन विस्तार योजनेच्या अंमलबजावणी नंतर कंपनी ब्रिटीश एअरवेज व वर्जिन एअरवेज या दोनही कंपन्याशी स्पर्धा करण्यास सक्षम होणार असल्याचे सांगीतले.

यामूळे या दोनही कंपन्यांना भारतातल्या सेवादरात कपात करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. गोयल म्हणाले की, जेट एअरवेजचे मुंबई ते लंडन पर्यतचे प्रथम श्रेणीचे भाडे दोनही कंपन्यापेक्षा 20 टक्क्यांनी कमी राहणार असल्याचे सांगीतले.

आगामी दोन वर्षात बोईंग 777 व एअरबस 330 कंपनीच्या 20 विमानांच्या ताफ्याचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात आले.