सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

सरकार तांदळाची आयात करणार- प्रणव

खरीप पिकं वाया गेल्यानंतर केंद्र सरकारने आता तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वी वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनीही तांदळाच्या आयातीची तयारी सरकारने सुरू केल्याचे म्हटले होते.

चालू वर्षात मान्सून उशीरा आल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सरकार आगामी काळात तांदूळ आयात करणार असल्याचे प्रणव यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारने एमएमटीसी, एसटीसी आणि पीईसीला तांदूळ आयात करण्याचे आदेश दिले असल्याची माहितीही प्रणव यांनी दिली आहे.
सध्या सरकारी गोदामात 60 लाख टन तांदूळ आणि 70 लाख टन गहू उपलब्ध असल्याचे प्रणव म्हणाले.