शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 6 मार्च 2018 (10:12 IST)

एअर एशिया इंडिया तिकीटवर तब्बल ९० टक्के डिस्काऊंट

air ashia

एअर एशिया इंडिया या विमान कंपनीने ग्राहकांना फ्लाईट तिकीटवर तब्बल ९० टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे. मात्र, यासाठी ११ मार्चपूर्वी तिकीट बूक करावं लागणार आहे. लो कॉस्ट एअरलाईन्स कंपनी एअर एशियाने नवी ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीच्या अॅपवर तिकीट बुक करणाऱ्यांना प्रवाशांना ३ सप्टेंबर ते २८ मे २०१९ पर्यंत प्रवास करण्याची संधी आहे.

एअरलाईन्सने या ऑफरचं नाव Big loyalty असं ठेवलं आहे. यानुसार एअर एशियाच्या बिग मेंबर्स आयडीवरुन बिग पॉईंट्स मिळवू शकता आणि या ऑफरसाठी स्वत:ला सक्षम बनवू शकता. डिस्काऊंटसोबतच एअर एशिया आपल्या ग्राहकांना फ्री गिफ्ट्सही देत आहे. ही ऑफर केवळ बिग मेंबर्ससाठीच उपलब्ध आहे. या ऑफरनुसार कमीत कमी तिकीटाचा दर ७९९ रुपयांपासून सुरु होतो तर अधिकाधिक ५५०० रुपये आहे. एअर एशियाच्या वेबसाईटवर दिल्ली वगळता सर्व प्रमुख विमानतळावर तिकीट दर दाखवण्यात आला आहे.