1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (11:42 IST)

सर्व बँका सुरु राहाणार

All banks will continue
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने (जीवनाश्मक वस्तूंचे दुकाने वगळता) 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. मात्र तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना वगळण्यात आलं आहे. राज्यशासनाने याबाबत प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे.
 
“रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित स्वतंत्ररित्या कार्य करणारे प्रायमरी डिलर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित बाजारपेठेत कार्य करणारे वित्तीय बाजारातील सहभागीदार यांना 31 मार्च पर्यंतच्या खासगी आस्थापना बंदीतून वगळण्यात आले असून या वित्तीय संस्थांचे कामकाज सुरु असणार आहे”, असं राज्य शासनाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.