शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

घ्या अवघ्या 8.35% व्याजदराने गृहकर्ज

बँक ऑफ बडोदा अवघ्या 8.35% व्याजदराने गृहकर्ज देत आहे. जो या क्षेत्रात सर्वात कमी दर आहे. देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियालाही आजपर्यंत एवढ्या कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देता आले नाही. बँक ऑफ इंडिया स्वस्त व्याजदराने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

बँकेने जुन्या होमलोन ग्राहकांना त्याचं कर्ज नवीन व्याजदरात रुपांतरीत करुन घेण्यासाठी आवश्यक चार्जही माफ केला आहे.“एमसीएलआरमध्ये 0.55-0.75 टक्क्यांच्या कपातीनंतर बँकेने 7 जानेवारीपासून गृहकर्जाचा व्याजदर 0.70 टक्क्यांनी कमी केला आहे. बँक सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे,” असं बँक ऑफ इंडियाच्या एका परिपत्रकात म्हटलं आहे.