बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आता मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांचा संपाला पाठींबा

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला आता मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांनीही पाठींबा दिला आहे. आता  उद्यापासुन पालिकेचे कर्मचारीही बेस्ट कामगारांच्या संपात सहभागी होणार आहेत.  बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपात आता बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारीही आजपासून सहभागी झाले आहेत.  बेस्टच्या वीज पुरवठा संघटनेचे ६००० कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत अंधारात बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  संप न मिटल्यास म्युन्सिपल मजदूर युनियनचा संपात सहभागी होण्याचा इशारा अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.त्यामुळे हा संप चिघळणार हे स्पष्ट आहे.