बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (09:58 IST)

मोठी बातमी ! खाद्य तेल स्वस्त !

edible oil
गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढत आहे. खाद्यतेल, गॅस, भाजी पाल्यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. महागाई वेगाने वाढत आहे. आता गृहिणींसाठी चांगली बातमी आहे. खाद्यतेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळू शकतो. खाद्य तेलाच्या दरात घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने म्हटले आहे की , ऑक्टोबर 2021 पासून खाद्य तेलाचा किमतीत घसरण झाली आहे. देशातील प्रमुख कंपन्यांनी तेलाच्या दरात  15-20 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत घट  झाल्याचा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कपात केल्यावर नवीन दर लवकरच लागू केले जातील. देशातील अडाणी विल्मर आणि रुची इंड्रस्टीज , जेमिनी  एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, मोदी नेचरल्स, गोकुळ री -फॉयल अँड सॉल्व्हन्ट , विजय सॉल्व्हक्स, गोकुळ अग्रो रिसोर्सेज आणि एन के  प्रोटीन या प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरात कपात केली आहे. 
 
हैदराबादची जेमिनी एडिबल्स अँड फॅट कंपनीने गेल्या आठवड्यात फ्रिडम सनफ्लॉवर तेलाच्या एक लिटर पाऊचच्या किमतीत 15 रुपयांची कपात केली असून सध्या तेलाची किंमत 220  आहे. पण आता खाद्य तेल उत्पादक कंपन्यांनी 15-20  रुपयांची कपात केल्यावर आता तेलाचे दर 200  रुपये प्रति लिटर पाऊच मिळेल.