सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्र पहिले

रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरण स्पर्धेत चंद्रपूर आणि बल्लारशाह या दोन स्थानकांना पहिलं पारितोषिक विभागून देण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. या स्पर्धेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दोन स्थानकांवर विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेच्या आधारे पेंटिग्ज, मूर्तींच्या कलाकृती तसंच भित्तीचित्रांचा वापर करत सौंदर्यीकरण केले आहे.
 
या स्पर्धेत बिहारमधील मधुबनी स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर तामिळनाडूमधील मदुराई स्थानकानेही दुसरं स्थान पटकवलं आहे. तर गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधील कोटा आणि तेंलगणामधील सिंकदराबाद स्थानकांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या स्थानकांना 10 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 5 लाख रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी 3 लाख रुपये पुरस्कारात देण्यात येणार आहे.