पातंजली आवळा ज्यूसवर आर्मीमध्ये बंदी
मुंबई- योग गुरू रामदेव यांच्या पातंजली आयुर्वेदच्या पातंजली आवळा ज्यूसच्या विक्रीवर कॅन्टिन स्टोअर्स डिपार्टमेंटने रोख लावली आहे. एका शासकीय लॅबच्या रिर्पोटप्रमाणे हा प्रॉडक्ट प्रतिकूल नसल्याने सीएसडीने हे पाऊल उचलले.
सीएसडीद्वारे 3 एप्रिल 2017 रोजी एक पत्र पाठवून सर्व डिपोनां वर्तमान स्टॉकचे डेबिट नोट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते ज्याने स्टॉक परत करता येईल. पातंजलीने सुरुवातीला बाजारात काढलेल्या प्रॉडक्ट्समध्ये ज्यूस सामील होता ज्याबद्दल कंपनीने दावा केला होता की हे आरोग्यासाठी इतर कोणत्याही कंपन्यांच्या तुलनेत अधिक शुद्ध आणि उत्तम आहे.
या प्रकरणावर दोन अधिकार्यांप्रमाणे, या बॅचची चाचणी कोलकता येथील सँट्रल फूड लॅबोरेटरीमध्ये करण्यात आली असून हे उत्पाद वापरण्यासाठी योग्य नसल्याचे आढळले आहेत. पातंजलीने आर्मीच्या सर्व कॅन्टिनहून ज्यूस परत घेतले आहे.
पातंजलीबाबतीत असे पहिल्यांदा घडले नसून यापूर्वीही कंपनीच्या गुणवत्तेवर प्रश्न उचलले गेले होते. तसेच लायसेंसविना नूडल्स आणि पास्ता विकण्यासाठीही वाद निर्माण झाला होता.