आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांच्या घरावर इडीचे छापे
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका, मुख्याधिकारी चंदा कोचर कर्जात गैरव्यवहार केल्याचा आरोपा अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी सुरु असून, चंदा कोचर यांच्या घरावर आज ईडीने छापे टाकले आहेत. चंदा कोचर व व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ वेणुगोपाळ यांच्या घरावर, कार्यालयावर या आगोदर सुद्धा छापे टाकले होते. मुंबई, औरंगाबाद येथील कार्यालयावर छापे मारण्यावर आले होते. व्हिडीओकॉनला आयसीआयसीआय बँकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले, कर्जात गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून चंदा कोचर यांची चौकशी सुरु असून सीबीआय ने फक्त आतापर्यंत कागदोपत्र व इतर चौकशी केली.
या चौकशीत अजून काही मोठ्या लोकांची नावे समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.चंदा कोचर यांचे पती दीपक व व्हिडीओकॉनचे प्रमुख धूत यांनी २००८ मध्ये ५०-५० टक्के भागिदारीत न्यूपॉवर रिन्यूएबल प्रा.लि.ची (एनआरपीएल) सुरुवात केली. मात्र धूत यांनी काही दिवसात कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. व आपले समभाग दीपक यांच्या नावावर हस्तांतरित केले तर याच वेळी २०१२ मध्ये व्हिडीओकॉनला आयसीआयसीआयबँकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले, २ हजार ८४९ रुपयांचे कर्ज अजूनही थकीत आहे. त्यामुळे या कारवाईला फार महत्व प्राप्त झाले आहे.