पोस्टाची आकर्षक योजना, मिळवा अधिक व्याज
पोस्टाने अशीच एक योजना ग्राहकांसाठी आणली आहे. त्यानुसार, केवळ 10 रुपयांत पोस्टात खाते उघडले जाऊ शकते. पोस्ट खात्यात 5 वर्षीय पोस्ट ऑफिस डिपॉजीट अकाऊंट (आरडी) काढून आपणास हे खाते उघडण्यात येईल. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात हे खाते खोलता येईल. केवळ 10 रुपये भरुन हे खाते उघडण्यात येऊ शकते. या खात्यावर ग्राहकांना 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. जे व्याज बँकांमधून मिळणाऱ्या बचत खात्यापेक्षा अधिक आहे. सध्या, बँकांमधील बचत खात्यांवर 3.5 ते 6 टक्के (सर्वाधिक) व्याज मिळते. दरम्यान, या खात्यासाठी तुम्ही ज्वॉईंट पद्धतीनेही खाते खोलू शकता.
पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल.