1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (07:49 IST)

कारखान्याची धुरांडी पेटू देणार नाही ; राजू शेट्टींचा इशारा

raju shetty
उसाची एफआरपी आणि प्रतिटन 400 रुपये देण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू असा वारंवार इशारा देऊनही सरकारला गांभार्य नाही.मात्र आता 400 रूपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.मागचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय कारखाना सुरु होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. राज्य सरकार बेजबाबदार काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपी अधिक टनाला 400 रुपये इतकी रक्कम मिळाली पाहिजे, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.
 
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, गतवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाली असता एफआरपी ताबडतोब 15 दिवसांत हंगाम संपल्यानंतर, प्रतिटन 200 रुपये आणि वर्षभरात साखरेचे दर पाहून उर्वरित रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती.