शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 8 एप्रिल 2021 (08:15 IST)

व्याजदर ‘जैसे थे'; कर्जदारांना दिलासा

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झालेली वाढ आर्थिक विकासाच्या वाढीत अडथळा ठरेल. नव्याने घातलेले निर्बंध विकासाला मारक ठरतील, अशी भीती व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे'च ठेवले आहेत. महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची शक्यता शक्यता होती मात्र तूर्त व्याजदर ‘जैसे थे'च ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
 
बुधवारी आरबीआय गव्हर्नर दास यांनी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपोदर 4 टक्क्यांवर ‘जैसे थे' ठेवला आहे. तर रोख राखीव प्रमाणामध्ये कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) 3.35 टक्के ठेवला आहे. यामुळे कर्जदर वाढण्याची शक्यता कमी असून कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
 
यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या पतधोरण आढावत बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. फेब्रुवारीत महागाई दर 5 टक्क्यांवर गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्षपेक्षा अधिक आहे. अन्नधान्यांच्या किमती नजीकच्या काळात पुरवठा आणि मॉन्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असतील, असे दास यांनी सांगितले. 2020-21 या वर्षात भारताचा विकासदर 10. 5 टक्के राहील असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
 
मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या 24 तासांत 96 हजार 982 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. याच दिवशी तब्बल बरे झालेल्या 50 हजार 143 जणांना रुग्णालातून सोडण्यात आले तर 446 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. नव्याने लागू होणारे निर्बंध विकासाला बाधक ठरतील, असे दास यांनी सांगितले. महागाई वाढीवर देखील आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. 2021 च्या चौथ्या तिमाहीत महागाई दर 5 टक्के राहील तर 2021-22 च्या पहिाल्या समाहित विकास दर 4.4 टक्के राहील तर तिसर्या तिमाहीत तो 5.1 टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. विकासाला चालना देण्याच्या उपायोजना बँकेकडून केल्या जातील आणि तसे पतधोरण असेल, असे दास यांनी यावेळी स्पष्ट केले.