काही ठिकाणी मॉल उघडले मात्र उलाढाल ७७ टक्के घटली
चीनचा व्हायरस असल्लेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं पौउल उचलत देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारनं अनलॉक धोरण जाहीर करत केंद्र सरकारनं ८ जूनपासून लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. मॉल सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, लॉकडाउनचे परिणाम अजूनही सर्व ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत. देशात आणि राज्यात अनलॉक जाहीर करून दोन आठवडे उलटले आहे. तरी शहरातील सर्वात अधिक खरेदी विक्री केंद्र असलेले मॉलमधील खरेदी विक्रीत मोठी घट झाली असे दिसून येतंय. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच्या तुलनेत मॉलच्या व्यवहारात ७७ टक्क्यांची घट झाल्याचं समोर आलं आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियानं एक पाहणी केली आहे. तर वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार,पाहणी नुसार मॉल मधील व्यवहार घटल्याचं दिसून आलं आहे. तर पाहणीनुसार वर्षाभरापूर्वीच्या खरेदी-विक्रीशी तुलना केल्यास जूनमधील पहिल्या पंधरा दिवसात मॉल्सच्या व्यवसायात ७७ टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं आहे. म्हणजे सध्याची उलाढाल पूर्वीच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. २३ टक्केच उलाढाल मागील पंधरा दिवसात झाली आहे.
केवळ मॉल्समधील दुकानांच्या खरेदी विक्रीतच घट झालेली नाही. बाजारपेठांमधील इतर व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. त्यांच्या व्यवसायात ६१ टक्क्यांची घट झाल्याचं पाहणीत दिसून आलं आहे. लॉकडाउन शिथिल झाला असला, तरी ग्राहकांची खरेदी इच्छाशक्ती कमी असल्यानं त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.