रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

दुधाच्या दरात वाढ, दूध उत्पादक शेतकरी मात्र संकटात राष्ट्रवादीची टीका

सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका राज्यात अनेक घटकांना बसतोय. दुधाच्या बाबतीतही सरकारला धोरण लकवा झाला असावा. त्यामुळे दूध उत्पादकांवर संकटाचे ओझे वाढले आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यामुळे शेतकरी दूध उत्पादनाकडे वळत आहेत. जळालेली पीके व झालेल्या नुकसानातून मार्ग काढण्यासाठी दूध उत्पादन करूनही दूध उत्पादकाला याचा फायदा मिळत नाही ही शोकांतिका आहे. कारण दुधाच्या किमतीत वाढ होत आहे त्याचा फायदा खासगी कंपन्यांना होत आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात सरकारविरोधी प्रचंड नाराजी आहे. दुष्काळी भागात चारा छावण्यांची मागणी करूनही त्याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही अशी टीका राष्ट्रवादी कोन्ग्रेस ने त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया पेजवर केली आहे. पुढे त्यांनी प्रधानमंत्री मोदींवर टीका करत म्हटले की मोदी आयेगा तो... महंगाई लायेगा... बघा झलक !
 
मोदीं सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांची फसवणूक केली. यावरच हे सरकार थांबले नाही तर या सरकारने शेवटच्या क्षणीही जनतेची फसवणूक केली आहे. अखेरच्या टप्प्याच्या मतदानानंतर सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात ५ पैशांची तर डिझेलच्या दरात ९ पैशांची वाढ झाली आहे. पुन्हा एकदा दरवाढ झाल्यामुळे आता मुंबईत पेट्रोलचा दर ७६.७८ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ६९.३६ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर इंधनाची दरवाढ करणे या सरकारने थांबवले होते मात्र निवडणूक संपताच पुन्हा एकदा मोदी सरकारने सामान्यांवर महागाईची कुऱ्हाड मारली आहे. सरकार सामान्य जनतेची थट्टा करत आहेत का?