1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (10:15 IST)

लोकसभा मतदान पूर्ण संपले आता पेट्रोल, डीझेल नंतर दुधाचे दर वाढले जाणून घ्या किती ?

price of milk after petrol and diesel has increased
लोकसभा मतदान पूर्ण झाले असून २१ मे रोजी निवडणुका आहेत. मात्र इतक्या दिवस पेट्रोल आणि देझेलचे दर वाढले नव्हते तर दूधही स्थिर होते मात्र आता सर्व दर वाढत आहेत. सर्व टप्प्यातील मतदान १९ मे रोजी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ८ ते १० पैशांनी तर डिझेलच्या दरात १५-१६ पैशांनी वाढ झाली आहे.इंधन दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ७१.०३ वरुन ७१.१२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर, डिझेलचा दर ६५.९६ रुपयांवरुन ६६.११ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच मुंबईत पेट्रोलच्या दरात ९ पैशांची वाढ झाली असून आजचा दर ७६.७३ रुपये इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात १६ पैशांनी वाढ झाली असून आजचा दर ६९.२७ रुपयांवर पोहोचला आहे.अमूलची मालकी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडे आहे. या महासंघासोबत राज्यातील १८ डेअरी जोडलेल्या आहेत. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी म्हणाले, गेल्या काही दिवासंपूर्वी अमूलने दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी दूध खरेदी मूल्य १० रुपयांनी वाढवले आहे. त्यामुळे अमूल डेअरीशी जोडलेल्या 1200 दूध असोसिएशनच्या सात लाख पशुपालन करणाऱ्यांना याचा फायदा पोहोचला होता. तसेच गेल्या काही वर्षामध्ये उत्पादनाच्या खर्चात २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अमूल दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करावी लागत आहे.अमूलचे टोंड मिल्क (ताजा) ४२ रुपये लिटर आहे तर फुल क्रीम मिल्क (गोल्ड) ५२ रुपये लिटर दराने उपलब्ध आहे. मात्र, मंगळवार पासून दोन रुपयांची वाढ केल्याने हेच दूध अनुक्रमे ४४ आणि ५४ रुपये लिटरने मिळणार आहे.