शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 17 मे 2019 (10:52 IST)

आरबीआयच्या नव्या नियमामुळे देशातील अर्ध्यांहून जास्त ATM बंद होणार?

आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण गेल्या काही दिवसांपासून देशात एटीएमची संख्या कमी होत आहे. आरबीआयने लागू केलेल्या काही नियमावलीमुळे देशातील निम्मे एटीएममध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार, नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमात एटीएम मशीनबाबत काही नवे नियम व अटी लागू केल्या आहेत. या कारणामुळे सर्व बँकांना आणि एटीएम मशीनमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागत आहे. हे बदल करण्यासाठी बँकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने, काही बँकांनी एटीएम मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेक ठिकाणी बँकांचे एटीएम बंद करण्यात आले आहे. असं असलं तरीही, एटीएमद्वारे पैसे काढण्याचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
काय आहे आरबीआयचे एटीएमबाबत नवे नियम काय?
 
सर्व एटीएममध्ये दरवेळी 100 करोडपेक्षा जास्त रक्कम असणं गरजेचं आहे.
एटीएममध्ये सीसीटिव्ही, जीपीएस, वायरलेस कम्युनिकेशन आणि हुटर्स असणं अनिर्वाय आहे.
सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक असणे गरजेचं आहे.
एटीएममध्ये पैशांची ने आण करणाऱ्या व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक असणे गरजेचं आहे.