गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (18:30 IST)

नवीन बँक लॉकर नियम: लॉकर मध्ये पैसे ठेवण्यापूर्वी आरबीआयचे नियम जाणून घ्या

Bank Locker
New Bank Locker Rules:आजच्या डिजिटल युगात, लोकांना कमी रोख ठेवण्याची सवय लागली आहे, ते ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत. या सर्व सुविधा देण्यात बँकेचा मोठा वाटा आहे.प्रत्येकाची बँक वेगवेगळी असते पण सर्व बँकांचे नियम आरबीआय ठरवते. 

काही दिवसांपूर्वी आरबीआय ने बँक लॉकर संबंधित नियम बनवले होते त्यात काहीसे बदल करण्यात आले आहे. 
आरबीआयच्या नवीन बँक लॉकर नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यात नवीन नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने बँक लॉकरमध्ये आपले सामान ठेवले आणि ते खराब झाले तर त्याचे  नुकसान भरण्याची जबाबदारी बँकेची असेल. 
 
बँक ग्राहकाला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम देण्यास बांधील असेल.बँकेत आग, दरोडा किंवा अन्य कोणतीही आपत्ती घडल्यास बँक ग्राहकाला त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देईल.
 
तुम्हाला बँकेत लॉकर घ्यायचे असेल, तर तुम्हाला प्रथम ज्या शाखेत तुमचे लॉकर उघडायचे आहे तेथे जावे लागेल.
 
ही तुमच्या जवळची कोणतीही शाखा असू शकते आणि त्यानंतर तुम्हाला तेथे अर्ज सबमिट करावा लागेल. तुम्हाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लॉकरचे वाटप केले जाते. अर्ज केल्यानंतर तुमचे नाव बँकेच्या प्रतीक्षा यादीत दिसल्यास, तुम्हाला लॉकर दिले जाणार.या साठी तुम्हाला वार्षिक तत्त्वावर भाडे द्यावे लागणार. 
 
Edited by - Priya Dixit