मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (15:50 IST)

Alto चा नवीन अवतार, SUV सारखा लुक!

मारुती सुजुकीची ऑल्टो पहिल्यांदा सप्टेंबर 2000 मध्ये लॉन्च झाली होती आणि 2004 मध्ये ऑल्टो देशात सर्वाधिक विकली जाणारी कार झाली आणि आतापर्यंत विक्रम सुरूच आहे. मागील 16 वर्षांपासून मारुती सुजुकी ऑल्टो बेस्ट सेलिंग कार आहे.
 
आतापर्यंत ऑल्टोची 40 लाख युनिट विक्री झाल्यामुळे मागील महिन्यात या कारच्या नावावर रेकॉर्ड तयार झाला आहे. शानदार डिझाइन, सोपे ऑपरेशन्स, चांगलं मायलेज, लो मेंटेनंस आणि शहरात चालविण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे ऑल्टो नेहमीच ग्राहकांची पसंत राहिली.
 
लॉन्चिंगपासून आतापर्यंत अनेकदा ऑल्टोच्या लुकमध्ये बदल करण्यात आले आहे. आता पुन्हा मारुती आपल्या या आवडत्या गाडीला नवीन लुकमध्ये लॉन्च करायची तयारी करत आहे. नवीन ऑल्टो नेक्स्ट जनरेशन कार असेल.
 
अद्याप याबद्दल आधिकारिक माहिती मिळालेली नाही तरी नवीन लुक एसयूव्हीप्रमाणे स्टाइलिश असू शकतो. यात अपडेटेड बंपर, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि रिवाइज्ड हेडलँप्स दिले जाऊ शकतात. याच्या इंजिनमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
सध्याची ऑल्टो
ऑल्टो बीएस-6 नॉर्म्स, 796 सीसी च्या 3 सिलेंडर इंजिनसह
सुरुवाती किंमत- 2,94,800 रुपये
पेट्रोल व्हेरिएंट मायलेज- 22.05 किमी प्रती लीटर
सीएनजी व्हेरिएंट मायलेज- 31.50 किमी प्रती लीटर