गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मुंबई : आता ओला एसी शटल बस सेवा

मोबाईल अॅपवर कॅब उपलब्ध करुन देणारी ओलाची आता एसी बसही लवकरच रस्त्यावर धावणार आहेत. ओला मुंबई शहरात एसी शटल बसची सुरुवात करणार आहे. ही शटल सेवा पूर्णत वातानुकूलित असेल.

ओला अॅपवर या बसचं बुकिंग करता येणार असून अगदी कमी दरात म्हणजेच 4 रुपये प्रति किमी पैसे आकारले जाणार आहेत. याचं सुरुवातीचं भाडं 49 रुपये असेल. मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजे  या बस चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचवतील.

सकाळी 7 ते 11 दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान या बस धावतील. ही शटल सेवा मिरा-भाईंदर ते पवई, भाईंदर, भाईंदर-अंधेरी, भाईंदर ते बीकेसी मार्गावर सुरु केलं जाईल.