'एक देश, एक रेशन कार्ड' ची तयारी सुरु
मोदी सरकारकडून नागरिकांना 'एक देश, एक रेशन कार्ड' या योजनेची तयारी सुरु केली आहे. याची माहिती केंद्रीय अन्न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी दिली आहे. सरकार याच दिशेने काम करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितली.
केंद्रीय मंत्री राम विलास पासवान म्हणाले की, देशभरात रेशन कार्डची पोर्टेबिलिटीच्या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. यामुळे सर्व लाभार्थ्यांना विशेष करुन प्रवशांना देशभरात कुठेही सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून (PDS) रेशनधान्य मिळू शकेल. केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी गुरुवारी राज्यांच्या अन्न सचिवांची व सरकारी अधिकार्यांच्या बैठकीत ही माहिती दिली.