शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (10:30 IST)

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर,आजचे दर जाणून घ्या

petrol diesel
पेट्रोल डिझल चे दर वाढून ते मागील चार दिवसांपासून स्थिर झाले आहे. अचानक काही दिवसात तब्बल 10 रुपयांची वाढ पेट्रोल आणि डिझल मध्ये झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. मात्र 4 दिवसांपासून हे दर स्थिरावले आहे. एवढ्या मोठ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. 
 
तेल कंपन्यांच्या वतीने आज तिसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.
 
कोलकात्यात पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी 4नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. 
 
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल112 डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.