सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 27 मे 2021 (09:46 IST)

Petrol Price Today: पेट्रोल डिझेलाची किंमत विक्रमी उच्चांकावर, जाणून घ्या चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलाचे दर

यावेळी पेट्रोल डिझेलाची किंमत (Petrol Diesel Price Today) विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. सांगायचे म्हणजे की या महिन्यात इंधनाची किंमत (Fuel Price) अनेक हप्त्यांमध्ये वाढविण्यात आली आहे. निवडणुकीनंतर 15 तासानंतर पेट्रोल 3.33 पैशांनी महागले आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लीटर 3.85 रुपयांनी महाग झाला. राजस्थानच्या श्रीगंगा नगरातील पेट्रोल सध्या 104.67 रुपयांना विकले जात आहे.
 
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात 24 पैसे आणि डिझेलच्या दरात 29 पैशांची वाढ केली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज 1 लीटर पेट्रोलची किंमत 93.68 रुपये आहे. त्याचबरोबर एक लीटर डिझेलची किंमत 84.61 रुपये आहे.
 
चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर
दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत 93.68 रुपये आहे. त्याचबरोबर एक लीटर डिझेलाची किंमत 84.61 रुपये आहे.
मुंबईत पेट्रोल 99.94 रुपये आणि डिझेल 91.87 रुपये प्रति लिटर.
चेन्नईमध्ये पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 89.39 रुपये प्रति लीटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल 93.72 रुपये आणि डिझेल 87.46 रुपये प्रतिलीटर आहे.