'रिलायंस' ने ब्रिटिश पेट्रोलियमला मागे टाकले
आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने नवा इतिहास रचला आहे. मंगळवारी 9.5 लाख कोटींचे बाजारमूल्य कमावणारी पहिली भारतीय कंपनी बनली होती. यानंतर बुधवारी ब्रिटिश पेट्रोलियम ला मागे टाकत तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्सचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर झाली होती. तर ब्रिटिश पेट्रोलियमचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर होते. यंदा रिलायन्सच्या शेअरमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. ब्ल्यूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार शेअरच्या वाढीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढून 56 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे त्यांनी जॅक मा यांनाही मागे टाकले आहे.