SBI ने शेतकरी बांधवांसाठी आणली नवी योजना,शेतकरींना मोठा फायदा होणार,जाणून घ्या काय आहे
शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे की SBI ने त्यांच्यासाठी एक विशेष योजना लॉन्च केली आहे. ही योजना त्यांच्यासाठी फायद्याची आहे ज्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे.'तात्काळ ट्रॅक्टर लोन 'असं या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत SBI शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी किमतीच्या 100 टक्के कर्ज देणार आहे. या साठी काही अटी देखील SBI ने घातल्या आहेत.
ट्रॅक्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकेल पण त्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 2 एकर शेती असणे आवश्यक आहे. त्याशिवाय कर्जामध्ये नमूद केलेले नातेवाईकच सह अर्जदार बनू शकतात.त्यासाठी शेतकरीचे काही कागदपत्रे लागतील जसे की ओळखीचा आणि रहिवासी पुरावा देण्यासाठी पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट , ड्रायव्हिंग लायसेन्स या पैकी कोणतेही एक पुरावे द्यावे लागणार.
या योजनेचे वैशिष्टये असे आहेत की आपल्याला ट्रॅक्टरचा विमाशुल्क आणि ट्रॅक्टर चे पूर्ण पैसे कर्जात मिळतील. ट्रॅक्टर मध्ये लागणारा अतिरिक्त साधनांचा खर्च मात्र दिला जाणार नाही. या साठी आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करतानाची 0.50 टक्के प्रोसेसिंग फी द्यावी लागणार. आपल्याला कर्ज घेतलेली रक्कम 4 ते 5 वर्षात फेडावयाची असल्यास त्यासाठी देखील SBI ने पर्याय दिला आहे.
कर्ज देण्यापूर्वी बँक आपल्या जमिनीची खात्री करून कर्ज देईल ती जमीन लागवडीसाठी योग्य आहे किंवा नाही हे पडताळून घेईल या साठी आपल्याला जमीनीचे पुरावे सादर करावे लागणार. आता जे शेतकरी बांधव पैसे नसल्यामुळे ट्रॅक्टर घेऊ शकत नव्हते त्यांच्या साठी ही योजना फायदेशीर आहे.