मोठी बातमी! ZEE एंटरटेनमेंट, सोनी पिक्चर्सनेटवर्क्स इंडियामध्ये विलीन होण्यासाठी मंडळाने मान्यता दिली, पुनीत गोयंका कंपनीचे एमडी आणि सीईओ

Last Modified बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (11:38 IST)
झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने ZEEL आणि SPNI (सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया) यांच्यातील कराराला मंजुरी दिली आहे. यानंतर सोनी देखील दीर्घ गुंतवणूक करणार आहे.
झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया यांच्यातील विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसच्या संचालक मंडळाने ZEEL आणि SPNI (सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया) यांच्यातील कराराला मंजुरी दिली आहे. या विलीनीकरणाबाबत, मंडळाचा विश्वास आहे की हे विलीनीकरण शेयरधारकांसाठी खूप चांगले सिद्ध होईल.

झी बिझनेसच्या मते, ZEEL ने रणनीतीणीच्या लाभाला लक्षात ठेऊन दक्षिण आशियातील एक लिडिंग मीडिया आणि मनोरंजन कंपनी विलीन केली आहे. आता हे विलीनीकरण पूर्णतः कार्यान्वित करण्यासाठी ZEEL व्यवस्थापन कार्य करेल. या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर पुनीत गोयंका कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील. या विलीनीकरणासाठी विशेष गुंतवणूक रणनीती देखील तयार करण्यात आली आहे.
माहितीनुसार, या विलीनीकरणानंतर, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट $ 1575 दशलक्ष (सुमारे 11,605 कोटी रुपये)
गुंतवणार आहे. या गुंतवणूकीची रक्कम वाढीसाठी वापरली जाईल आणि विलीनीकरणानंतर सोनी एंटरटेनमेंट बहुसंख्य शेयरधारक असेल. दोन्ही पक्षांमध्ये एक नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी झाली आहे.पुढील व्यवहार 90 दिवसात केले जातील.

झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांच्यामध्ये या विलीनीकरणानंतर, कंपन्यांमधील भागिदारीबाबत अनेक बदल होणार आहेत. असे सांगितले जात आहे की यानंतर ZEEL च्या भागधारकांचा वाटा सध्याच्या परिस्थितीत 61.25% असेल. तर सोनीद्वारे 1575 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर भागीदारीत बदल होईल. या गुंतवणूकीनंतर, ZEEL च्या गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे 47.07% असेल आणि सोनी पिक्चर्सच्या भागधारकांचा हिस्सा 52.93% असण्याची शक्यता आहे.
ZEEL आणि SPNI दरम्यान एक विशेष नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी करण्यात आलीआहे. करारातील बाकी व्यवहार पुढील 90 दिवसात पूर्ण केले जातील. विद्यमान प्रवर्तक ZEEला आपली हिस्सेदारी 4 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा पर्याय असेल. मंडळावरील बहुतेक संचालकांना नेमणूक करण्याचा अधिकार सोनी समूहाला असेल.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार ...

काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार मोफत, जाणून घ्या काय आहे योजना
अहमदाबाद. अहमदाबाद महानगरपालिकेने लोकांना COVID-19 विरुद्ध संपूर्ण लसीकरणासाठी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी ...

भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली
नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या ...

सहायक कक्ष अधिकारी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, ...

6 डिसेंबर रोजी किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णत: बंद ...

6 डिसेंबर रोजी किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश
मुंबई शहर जिल्ह्यातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन पर्यंतचा ...

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला ...

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे भारतासह अनेक देशात भीती सह पुन्हा खळबळ ...