सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एसबीआयने कर्मचार्‍यांना दिली 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा

मुंबई- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता बँकेतील कर्मचारी आपल्या घरी बसल्या अर्थात वर्क फ्रॉम होम करू शकतात.
बँकेच्या निदेशक मंडळाने अलीकडेच आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम नीतीला मंजुरी दिली आहे. यात कर्मचारी मोबाइलद्वारे घरातून काम करू शकतात ज्याने कोणतीही तत्कालिक आवश्यकता पूर्ण केली जाऊ शकते.
 
बँके आता मोबाइल कंप्यूटिंग प्रौद्योगिकी वापरेल आणि सर्व उपकरणांवर नियंत्रण राहील ज्याने मोबाइल उपकरणांवर डेटा आणि अॅप्लिकेशंस सुरक्षित ठेवले जातील आणि त्यांचे प्रबंधन केले जाईल.