मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (17:02 IST)

एसबीआयचे पुन्हा बंधने आता खात्यातून काढा फक्त २० हजार

आपल्या देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममध्ये रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी केली आहे. या नवीन निर्णयानुसार  ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार असून, संताप होणार आहे. तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर 31 ऑक्टोबरपासून एका दिवसाला तुम्ही फक्त 20 हजार रुपयेच काढू शकणार आहात. तर एटीएममधून आगोदर रोज एका दिवसात 40 हजार रुपये काढण्याची मर्यादा दिली होती. एसबीआयने याबबात सर्वच शाखांना आदेश दिले असून, लवकरच निर्णय लागू होणार आहे. एटीएमच्या माध्यमातून लोकांचे पैसे लुटण्याचे प्रकार वाढले असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियांने हा निर्णय घेतला असे स्पष्ट केले आहे. तर डिजिटल व्यवहारांचा चालना देण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे बँकांमध्ये गर्दी वाढण्याची देखील वाढली आहे. तर मोठे व्यवहार करण्यासाठी आता तुम्हाला डिजीटल किंवा बँकेत जावून पैसे काढावे लागणार असून, वर्षभरात एटीएमच्या माध्य़मातून लोकांना फसल्याच्या आणि लुटल्य़ाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बँकेने हे पाऊल उचललं आहे. मात्र या निर्णयामुळे व्यापारी आणि इतर नागरिकांना मोठा संताप होणार आहे.