शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (15:16 IST)

पैसे नसले तरीही तिकीट, ST महामंडळाचा निर्णय

st buses
राज्य परिवहन महामंडळाने सुमारे 5 हजार नव्या स्वाईप मशिनची खरेदी केल्याने आता प्रवाशांना आता ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. प्रवाशी फोन पे, गुगल आदी 'युपीआय' द्वारे ति‍कीट काढू शकतात.
 
पहिल्या टप्प्यात सात एसटी विभागांना नवे स्वाईप मशिन देण्यात असून जुलै महिन्यात उर्वरित विभागांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना कॅश नसले तरी एसटी प्रवास करता येणार आहे.
 
एसटी प्रशासनाने काही महिन्यापूर्वी स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरू केली असताना केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीट दिले जात होते. मात्र यात काही अडचण निर्माण होत होत्या. हे लक्षात घेत एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक बदल केला आहे. नव्या मशिनमध्ये 'युपीआय'ची सोय करण्यात आली आहे.
 
सात विभागाचा समावेश: लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर, व भंडारा विभागाचा समावेश आहे तसेच वाहकांना देखील प्रशिक्षण देणे सुरु झाले. येत्या काही दिवसांतच प्रवाशांना युपीआय ॲपद्वारे तिकीट मिळेल.