शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (16:31 IST)

हा संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प : फडणवीस

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि पंतप्रधान मोदींची अभिनंदन करतो. विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आज त्यांनी माडंला आहे. हा अर्थसंकल्प विशेषता येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा आहे. एकीकडे कृषी क्षेत्रासाठी प्रचंड मोठ्याप्रमाणात तरतूदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील आज जी काही आव्हानं आहेत, ज्या काही अडचणी आहेत. त्या सर्व विचारात घेऊन जो १६ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. तो उत्पादकता वाढवण्यापासून ते मला वाहतूक, निर्यात, बाजारपेठांशी जोडणी करणे या प्रत्येक बाबीतील ज्या काही कमतरता आहेत, त्या भरून काढणारा असा हा कार्यक्रम आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर तरतूद देखील मोठ्याप्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे.
 
आपल्याला जर आपला विकासदर कायम ठेवायचा असेल व रोजगार निर्मिती करायची असेल तर मोठ्याप्रमाणावर त्यासाठी पायाभूत सुविधांवर गुंतवणूक ही महत्वाची आहे. देशभरातील ६ हजार ५०० प्रकल्प शोधून तब्बल १०३ लाख कोटी म्हणजे जवळजवळ २० लाख कोटी दरवर्षींची गुतंवणुकीची जी काही योजना बनवण्यात आलेली आहे. यामधुन पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप मोठ्याप्रमाणात विकास होणार आहे. मग, यामध्ये १०० विमानतळं असतील, प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा, देशभरातील रस्ते व महामार्गांची कामं, रेल्वेचे विविध प्रकल्प आदी सर्व प्रकारचे प्रकल्प तयार होत आहे. कृषी व पाटबंधारे विभागातील पायाभूत सुविधा आदींचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.