मंगळवार, 22 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (15:00 IST)

66 टक्के लोकांना रोजचा खर्च भागवणेही कठीण

देशाच्या सुस्तावलेल्या अर्थव्वस्थेच्या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण चिंतेत टाकणारे आहे. सामान्य माणसावर महागाई आणि आर्थिक मंदीचा डबल मारा होत आहे. सुमारे 66 टक्के लोकांना घरखर्च चालवायलाही नाकी नऊ येत आहेत.
 
आयएएनएस सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, एकूण 65.8 टक्के लोकांचे म्हणणे आहे की त्यांना जचा खर्च करणेही कठीण होत आहे. सर्वेक्षणानुसार, अर्थसंकल्पाच्या आधी केलेल्या या सर्वेक्षणात सध्याची लोकांची आर्थिक स्थिती, रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवताना होणारी तारांबळ समोर आली आहे. पगार वाढत नाही, मात्र खाद्यपदार्थांपासून सर्व गरजेच्या वस्तूंच्या किमतीत गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांतला उच्चांकी आहे.  
 
विशेष म्हणजे 2014 मध्ये यूपीए सरकारच्या काळातही सुमारे 69.9 टक्के लोकांनी सांगितले होते की त्यांना आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करणे कठीण होते. मात्र 2015 च्या तुलनेत लोकांचा मूड आता आणखी वाईट आहे. चालू वर्षात लोकांमधील नकारात्मक दृष्टिकोनात वाढ झाली आहे.