गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अजून टोमॅटोचे दर ५ दिवसांनी कमी होणार

सध्या बाजारात टोमॅटो किलोला शंभर रुपये मोजावे लागत आहेत. परंतु, टोमॅटोचे दर येत्या ५ दिवसांत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टोमॅटोची आवक वाढणाऱ असल्याने दर कमी होणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या बाजारात टोमॅटोचे दर प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचले. आवक घटल्याने त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरांवर झाला आहे. २९ जूनला कोलकातामध्ये टोमॅटोचे दर ९५ रुपये प्रति किलो आहेत तर दिल्लीत ९२ रुपये किलो, मुंबईत ८० रुपये किलो टोमॅटो तर चेन्नईत ५५ रुपये किलोंनी टोमॅटोची विक्री केली जात होती.