मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 16 जुलै 2023 (13:41 IST)

Tomato price : केंद्र सरकार आजपासून टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकणार

tamatar
Tomato price : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे. टोमॅटो आता सर्व सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. लोकांनी जेवणातून टोमॅटो वगळले आहे. गेल्या तीन आठवड्यांत देशातील विविध शहरांमध्ये टोमॅटोच्या दरात अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.  मात्र अशा परिस्थितीत  सर्व सामान्य माणसाला दिलासादायक बातमी आहे. सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी टोमॅटोचे दर कमी केले आहेत. 
 
टोमॅटोच्या दराबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरू असून, किरकोळ बाजारात त्याचा भाव 300 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.मात्र यापूर्वी मोठे पाऊल उचलत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो 90 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली होती.  आता पुन्हा एकदा ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाने टोमॅटोच्या किमती कमी केल्या आहेत. आता 90 रुपये किलो ऐवजी सरकारी दराने टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकला जाणार आहे. 
 
टोमॅटोच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली एनसीआरसह देशातील विविध भागात सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट टोमॅटोची विक्री करत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी केल्यानंतर, NCCF थेट ग्राहकांना 90 प्रति किलो दराने टोमॅटो विकत होते आणि आता त्याची किंमत 10 ते 80 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. सरकार देशभरात जवळपास 500 ठिकाणी थेट टोमॅटोची विक्री करत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीतून सुटका करण्यासाठी सरकारचा हा उपक्रम फलदायी ठरत असल्याचे दिसत आहे.  
 
Edited by - Priya Dixit