गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (16:02 IST)

कांद्याचे दर कमी होणार?

कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे तसेच केंद्र सरकारने कांद्याचे दरावर नियंत्रण आणण्यासाठी कांद्याचा बंपर स्टॉक विक्रीस काढला असुन कांदाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे आधीच संकटात असनारा बळीराजावर केंद्राच्या ह्या निर्णयामुळे शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. केंद्राने खरेदी केलेल्या कांद्यातील १.११ लाख मे.टन कांदा विक्रीस काढला असुन त्याचा परीणाम कांद्याच्या दरावर होण्याची शक्यता असुन कांदा दहा ते बारा रूपये दरावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जवळपास पुढील महिन्यात महाराष्ट्रसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे कांदे काढण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.