1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 15 डिसेंबर 2011 (13:30 IST)

अ‍ॅपलच्या मूळ करारपत्राचा 15 लाख डॉलर्समध्ये लिलाव

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी अ‍ॅपलच्या स्थापनेसाठी 1976 मध्ये तयार करण्यात आलेल्या करारपत्राचा येथील सोथबी लिलावगृहात 15 लाख डॉलर्सहून अधिक किमतीत लिलाव झाला आहे.

तीन कागदांच्या असलेल्या या दस्तावेजावर अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, स्टीफेन वोजनिक आणि रोनॉल्ड वेएन यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या दस्तावेजाच्या लिलावसाठी सहा लोकांनी टेलिफोन व ऑनलाईनच्या माध्यमातून बोली लावल्याचे सोथ‍बीने म्हटले. या दस्तावेजास अखेर सिसनेरोज कॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी इदुअरडो सिसनेरोज हे विकत घेण्यात यशस्वी झाले.