सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

एनएमडीसी आणि सेलमध्ये करार

देशातील अग्रगण्य खनिज उत्पादक कंपनी नॅशनल मिनिरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) आणि स्टील कंपनी सेलमध्ये हिमाचल प्रदेशातील अरकी येथे एक प्रकल्प विकसीत करण्याससंदर्भात करार करण्यात आला आहे.

पोलाद मंत्री वीरभद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यापूर्वी सोमवारी पोलाद सचिव अतुल चक्रवर्ती आणि सेलचे चेअरमन एस के रुंगठा यांच्यात या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या. हिमाचल प्रदेशातील अरकीमध्ये 10 कोटी टन एसएमएस ग्रेडच्या चुन्याच्या दगडांचे भांडार आहे.