सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

दोन वर्षात होंडाची छोटी कार बाजारात

होंडाची छोटी कार दोन वर्षात भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. कंपनीने 2 सीव्ही कोड नावाची ही कार खास भारतातील आपल्या ग्राहकांसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅनोनंतर भारतीय बाजारात छोटी कार आणण्याची कंपन्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.

टोयोटा आगामी वर्षभरात भारतात छोटी कार लॉंच करणार आहे. सुझुकीही आपल्या सात कॉंपॅक्ट कारसह भारतीय बाजारातील भागिदारी वाढवण्याची तयारी करत आहे.

यापूर्वी टाटा नॅनो बाजारात आली असून, नॅनोला चांगली लोकप्रियता लाभली आहे. अजंतानेही नॅनोपेक्षा स्वस्तात कार तयार करण्याचा संकल्प केला आहे.

नॅनोची प्रसिद्धी पाहता अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात छोटी कार आणण्याची तयारी केली आहे.