फॉक्सव्हॅगनच्या विक्रीत 38 टक्क्यांची वाढ
युरोपियन ऑटो कंपनी असलेल्या फॉक्सव्हॅगन उद्योग समूहाला चालू वर्षातील ऑक्टोबर महिन्यात चांगला नफा झाला आहे. या कालावधीतील कंपनीची भारतातील विक्री 2,023 झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यात 38.18 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षात कंपनीने 1,464 वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या स्कोडा आडी, आणि फॉक्सव्हॅगन या ब्रांडसना भारतीय बाजारात चांगली मागणी आहे. कंपनीचे भारतातील अध्यक्ष आणि प्रबंध संचालक जॉर्ज मुलर यांनी कंपनीची भारतीय बाजारातील विक्री वाढल्याचे स्पष्ट करताना आगामी काळात यात आणखी वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. फॉक्सव्हॅगन भारतात तीन कारचे जवळपास 15 पॅकेट विकते.