भारतीय पोस्ट लवकरच 'ई- कॅामर्स' मध्ये उतरणार
भारतीय पोस्ट लवकरच फ्लिपकार्ट आणि अमेझॉनप्रमाणे 'ई- कॅामर्स' क्षेत्रात उतरणार असल्याचं दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटलंय. वस्तूंची डिलीव्हरी करण्यासाठी भारती पोस्ट आपल्या देशभर विस्तारलेल्या नेटवर्कचा आधार घेणार आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय पोस्ट विभागाचं ई-कॅामर्स पोर्टलदेखील सादर केलं आहे.
पार्सल डिलीव्हरी दरात किंवा प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या सेवांसह स्पर्धा, तसेच दर बदलण्यासाठी सर्वोच्च अधिकाऱ्यांकडून मान्यता प्राप्त करणे आवश्यक आहे. पोस्टाद्वारे ई-कॉमर्स व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागामध्ये नोंदणी करावी लागेल. भारतीय पोस्ट विभाग विक्रेत्यांकडून उत्पादनं घेऊन ती ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं काम करेल, असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलंय.