सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

महिंद्रा सत्यमला 37 कंपन्यांची नोटीस

आयटी कंपनी महिंद्रा सत्यमला 37 कंपन्यांनी नोटीस धाडली आहे. सत्यमने या कंपन्यांकडून बाराशे कोटी रुपये घेतल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. महिंद्राने सत्यमचे अधिग्रहण करण्यापूर्वी हे पैसे देण्यात आल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

कोट्यवधी खर्चून महिंद्राने सत्यमचे अधिग्रहण केले. आता 37 कंपन्यांनी सत्यमने घेतलेल्या पैशांसाठी महिंद्राकडे तगादा लावला आहे. सत्यमचे अधिग्रहण होण्यापूर्वी कंपनीने आपल्याकडून 1230 कोटी रुपये घेतल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे.

महिंद्राने या कंपन्यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत. रामलिंग राजू यांनी वैयक्तिक स्वरूपात ही रक्कम घेतल्याचे महिंद्राचे म्हणणे आहे.