मंगळवार, 8 एप्रिल 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By महेश जोशी|

सत्यमच्या विक्रीचे निकष पुढच्या आठवड्यात

आर्थिक गैरव्यहाराची बळी ठरलेल्या सत्यम कम्प्युटर्सच्या विक्रीचे प्रयत्न आता वेगात सुरू झाले आहेत. त्यासाठी विक्रीचे निकष पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळातील एक सदस्य दीपक पारेख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. कंपनीतील काही भागाच्या विक्रीसाठी खुला लिलाव घेऊन त्या द्वारे अधिकृतरित्या भागभांडवल उभे करण्याच्या प्रस्तावास कंपनी कायदे मंडळाने मान्यता दिल्याचेही पारेख यांनी सांगितले.

सत्यम घेण्यात इच्छुक असलेल्यांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. पण आम्ही त्यासाठी काही निकष ठरविणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे निकष किमान निधी, किमान शेअर्स यासारख्या आधावर ठरविण्यात येणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.