सेझ विरोधात राष्ट्रीय आंदोलनाची तयारी
देशातील विविध राज्यांमधील एसईझेड विरोधात आता विविध संघटनांनी एकत्र येत राष्ट्रीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 25 नोव्हेंबर पासून हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. सोशालिस्ट फ्रंट, आझादी बचाओ आंदोलन आणि नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुव्हमेंट यासह अनेक संघटनांनी हे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, यासह अनेक राज्यांमध्ये सेझसाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून, शेतकऱ्यांची यात फसवणूक केली जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.