शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|

'सारेगमप'चा विजेता प्रशांत दामले

WD
सारेगमपच्या तारांकित पर्वा अभिनेता प्रशांत दामलेंनी विजेता म्हणून आपली मोहर उमटवली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल महा अंतिम फेरी रंगली.

प्रशांतसह अमृता सुभाष, केतकी थत्ते, वैभव मांगले आणि अजय पुरकर यांनी सुरांची दमदार टक्कर देत महाअंतिम फेरी गाठली होती. मात्र प्रशांतने या सर्वांवर मात करीत विजेतेपद पटाकवले.

परिक्षक म्हणून अवधूत गुप्ते व वंदना गुप्ते यांनी काम पाहिले. तर हिंदीतील प्रसिद्ध संगितकार हरिहरन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.