शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

मंजुळेंच्या चित्रपटात झळकणार बिग बी

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून, महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उम‍टविल्यानंतर नागराज मंजुळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. नागराज मंजुळे अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अद्याप चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेले नसून कथेवर काम करण्यात येत आहे.
 
अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ट्विटर अकाउंटवरून मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले होते. सैराट या चि‍त्रपटाला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचे सर्व विक्रम सैराटने मोडीत काढले आहेत.