मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (15:51 IST)

अभिनेता आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत

अभिनेता आस्ताद काळेने देखील सरकार आणि राजकारण्यांवार निशाणा साधला आहे. त्याने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
 
या पोस्टमध्ये त्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकारणी यांना सवाल केला आहे. ‘प्रश्न विचारायचे आहेत. स्वत्व जपायचं आहे. कदाचित जीव गमवावा लागू शकतो. कारण.. श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही. अरे हाड. आम्ही प्रश्न विचारणार. सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार. नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश. निरोप घेतो’ असे म्हटले आहे. 
 
आस्तादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘हे बरोबर आहे’ असे म्हटले आहे. अशा अनेक कमेंट पोस्टवर पाहायला मिळतात.