डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे ६ डिसेंबर रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण

Last Modified शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (21:34 IST)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, सोमवार, दि.६ डिसेंबर २०२१ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दुपारी 1.30 वाजता प्रसारण होणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार

आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची निर्मिती संयुक्तरित्या केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ हा चित्रपट नक्की पहायला हवा.
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भुमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथालेखन सोनी तारापोरेवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपुर, फोटोदिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन ...

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा
7 जानेवारी 2022 हा प्रसिद्ध भारतीय अभिनेता इरफान खान याची 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील ...

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन
कर्नाटकची राजधानी बंगळुरू पासून 251 किमी अंतरावर चिकमंगळूर हे बाबा बुद्धनं टेकड्यांमध्ये ...

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार
सायकलस्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता ...